Mon, Aug 19, 2019 02:33होमपेज › Belgaon › कर्नाटक-महाराष्ट्र पाणी करार आज शक्य

कर्नाटक-महाराष्ट्र पाणी करार आज शक्य

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 29 2019 2:09AM
बेळगाव : प्रतिनिधी

कोयना धरणातून कर्नाटकसाठी कृष्णा नदीपात्रात 4 टीएमसी पाणी सोडण्यासाठी उद्या (बुधवार) करार होण्याची शक्यता आहे. कोयना धरणातील पाण्याच्या बदल्यात तितकेच पाणी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला पाणी देण्यात येणार आहे. यासाठी कागवाडचे आमदार बंगळूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. 

महाराष्ट्रातून कर्नाटकसाठी कृष्णा नदी पात्रात प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात चार टीएमसी पाणी टप्प्या टप्प्याने सोडण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र शासनाने पाण्यासाठी पाण्याची मागणी केल्याने हे पाणी मिळू शकले नाही. पाण्याच्या बदल्यात पाणी देण्यासाठी दोन्ही राज्याच्या सचिव पातळीवर करार होणार असून, याला कॅबीनेट मंत्र्यांची मंजूरीची आवश्यकता आहे. आचारसंहितेमुळे हे काम थांबले होते. आता आचारसंहिता संपल्याने उद्या बुधवारी याबाबत करार होण्याची शक्यता आहे. हा करार करुन उद्याच याची माहिती  महाराष्ट्र शासनाला देण्यात येणार आहे. लवकर पाणी मिळावे यासाठी कर्नाटक शासनही प्रयत्न करीत आहेत.