Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › जारकिहोळी, कुमठळ्ळी अपात्र?

जारकिहोळी, कुमठळ्ळी अपात्र?

Published On: Jul 14 2019 2:22AM | Last Updated: Jul 13 2019 11:54PM
बंगळूर : प्रतिनिधी

नाराजीनाट्याचे मूळ सूत्रधार असलेले गोकाकचे आ. रमेश जारकिहोळी आणि त्यांचे घनिष्ट मित्र अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी या दोघांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे. सभापती रमेशकुमार मंगळवारी हा निर्णय जाहीर करतील, असे समजते. शनिवारी सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तसे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्नाटकाच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ अपेक्षित आहे.

बंडखोर 13 आमदारांपैकी चार आमदारांनी घरवापसीची तयारी दर्शवल्याचे समजते, तर आणखी चार बंडखोरांशी  स्वतः मुख्यमंत्री कुमारस्वामी चर्चा करत आहेत. या तीन घडामोडींच्या आधारेच कुमारस्वामींनी स्वतःहून बहुमत सिद्ध करण्याची घोषणा केल्याचे मानले जाते.

सभापती रमेशकुमार यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रमेश जारकिहोळी आणि महेश कुमठळ्ळी पाच महिन्यांपासूनच पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. त्यानुसार फेब्रुवारीत त्या दोघांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. त्यानंतरही काँग्रेसने त्या दोघांविरुद्ध  पक्षविरोधी कारवाया केल्याची तक्रारी पुन्हा माझ्याकडे केल्याने त्यांना पुन्हा समज दिली होती, तरीही पक्षविरोधी कारवाया थांबल्या नव्हत्या. हे लक्षात घेऊन मी माझा निर्णय राखून ठेवला आहे. सभापतींनी दाखल केलेल्या वरील प्रतिज्ञापत्रामुळे आ. जारकिहोळी आणि आ. कुमठळ्ळी यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवले जाईल, हे निश्चित असल्याचे मानले जाते. तसे झाल्यास तो या दोघांना आणि भाजपलाही मोठा धक्‍का असेल. सभापती आपला निर्णय मंगळवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.

चौघांची घरवापसी?

काँग्रेसचे ज्येष्ठे नेते रोशन बेग, बंडखोरांचे नेते रामलिंगा रेड्डी, आ. एम. टी. बी. नागराज, आणि आ. मुनिरत्न यांनी आमदारकीचे राजीनामे परत घेऊन काँग्रेसमध्ये परत येण्यास संमती दर्शवली आहे. ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या, गुलामनबी आझाद आणि डी. के. शिवकुमार यांचे प्रयत्न सफल झाल्याचे मानले जाते. 
तर आ. बी. सुधाकर, बी. सी. पाटील, भैरती बसवराज आणि सोमशेखर या चौघांना परत आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री  कुमारस्वामी प्रयत्नशील आहेत.

*सिद्धरामय्यांना सीएम करा

मंत्री डी. के. शिवकुमार यांनी नाराज आमदार नागराज यांची शुक्रवारी उत्तररात्री 1 वाजता भेट घेतली. त्यावेळी नागराज यांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करा, अशी अट ठेवली असल्याचे समजते. मी जीवनात एकदा मंत्री व्हावे, असे वाटत होते. त्यानुसार मी मंत्री झालो. भाजपबरोबर जावून पुन्हा मंत्री होण्यात मला रस नाही, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

‘व्हीप’चे उल्लंघन आणि  अपात्र सदस्य ?

लोकसभा किंवा विधिमंडळ सदस्य तथा आमदार पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास अपात्र ठरू शकतात. अन्य पक्षात प्रवेश करणे किंवा पक्षादेश डालवून मतदान केल्यास ,अन्य पक्षांना मदत करणे, त्यांच्या बैठकांना हजेरी लावणे यासारख्या पक्षविरोधी कृती केल्यास सदस्यत्व धोक्यात येऊ  शकते.

 52 वी घटना दुरुस्तीत पक्षांतरबंदी कायदा

तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये  52 वी घटना दुरुस्ती करण्यात आली.  1985 पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही, अशी मूळ कायद्यात तरतूद करण्यात आली होती.  त्यानंतर हे प्रमाण वाढवण्यात आले. त्यानुसार एकूण आमदारांपैकी किमान दोन तृतियांश आमदारांनी पक्षांतर केल्यास पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाह.