Sun, Dec 15, 2019 05:58होमपेज › Belgaon › जमखंडी पोटनिवडणूक : ८१.५८ टक्के मतदान

जमखंडी पोटनिवडणूक : ८१.५८ टक्के मतदान

Published On: Nov 04 2018 1:16AM | Last Updated: Nov 03 2018 10:19PMजमखंडी ः वार्ताहर

जमखंडी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. एकूण 81.58 टक्के मतदान झालेे.  हिरेपडसलगी येथील बुथ क्रमांक 51 मध्ये व्हीव्हीपॅट यंत्रणा बिघडल्याने 35 मिनिटे मतदान बंद करण्यात आले. दरम्यान या केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. बीईएल कंपनीच्या अभियंत्यांना पाचारण करुन मशीन दुरुस्त करुन पुन्हा मतदानास प्रारंभ करण्यात आला. 

दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा हक्‍क बजावणे सोयीस्कर होण्याकरिता वाहनांची सोय प्रशासनातर्फे करण्यात आली होती. देशात पहिल्यांदाच  अशी सोय करण्यात आली असल्याचे बागलकोट जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी गंगूबाई मानकर यांनी सांगितले. 

येथील तालुका पंचायत मतदान केंद्राजवळ आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन दोघांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे कळते. या परिसरात भाजप कार्यकर्त्यावर विनाकारण पोलिसांनी लाठीहल्ला करुन दहशत निर्माण केल्याची तक्रार निवडणूक अधिकार्‍यांकडे संगमेश कौजलगी, यु. बी. महाबळशेट्टी, पी. सी. गेण्णूरमठ यांनी केली. जमखंडीत काँग्रेस उमेदवार आनंद सिद्दू न्यामगौड यांनी परिवारासह येऊन मतदानाचा हक्‍क बजावला तर तालुक्यातील हिरेपडसलगी येथे भाजप उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.  तोदलबागी येथील बुथ क्रमांक 47 मध्ये सखुबाई पंडित कदम या 102 वर्षाच्या वृध्द महिलेने व्हील चेअरवरुन येऊन मतदान केले. तर कोण्णूर येथे पिंकी गुग्गरी या युवतीने प्रथमच मतदान केले.