Mon, Jul 13, 2020 06:53होमपेज › Belgaon › भारतीय संघ उद्या बेळगावात

भारतीय संघ उद्या बेळगावात

Published On: May 21 2019 1:46AM | Last Updated: May 21 2019 1:48AM
बेळगाव : प्रतिनिधी

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगणार्‍या कसोटी सामन्यासाठी ऑटोनगर, कणबर्गी येथील क्रिकेट मैदान सज्ज झाले आहे. 25 मे पासून कसोटी सामना होणार असला तरी, भारतीय संघ 22 मे रोजी आणि श्रीलंकेचा संघ 23 मे रोजी बेळगावात दाखल होणार आहे.

भारत अ आणि श्रीलंका अ संघात बेळगाव येथे एक कसोटी व तीन एकदिवसीय सामने रंगणार आहे. या दोन्ही संघांत दिग्गज खेळाडू असणार असल्यामुळे बेळगावच्या क्रीडापटूंत उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआय पदाधिकारी महांत पारिख बेळगावला आले होते. त्यांनी मैदानाची व इतर सुविधांची पाहणी करून केएससीए पदाधिकार्‍यांना विविध सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली आहे.

बेळगावचे मैदान चारही बाजुंनी समान आहे. त्यामुळे सीमारेषा 76 यार्डांची करण्यात आली आहे. खेळपट्टी विशिष्ट दर्जाची राखण्यासाठी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार क्युरेटर प्रशांत यांनी मेहनत घेतली आहे.

22 मे रोजी भारतीय संघ बेळगावात दाखल होणार आहे. तीन दिवस सराव करण्यास मिळणार असून 25 ते 28 दरम्यान चार दिवसांचा कसोटी सामना रंगणार आहे. त्यानंतर जून महिन्यात 6, 8 आणि 10 रोजी एकदिवसीय सामने होणार आहे. बेळगावात पहिल्यांदा पुरूष संघांचे आंतरराष्ट्रीय सामने होणार असल्यामुळे क्रीडाप्रेमींत प्रचंड उत्सुकता लागून आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघाची निवड झाली आहे. त्यामध्ये अनेक महत्वाचे खेळाडू बेळगावात दाखल होणार आहेत.

भारत अ संघ

इशान किशन (कर्णधार), अमोलप्रित सिंग, ऋतुराज गायकवाड, रिकी भुई, शुभमन गील, दीपक हुडा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडे, संदीप वारीयर, प्रशांत चोप्रा, तुषार देशपांडे, इशान पोरेल.

श्रीलंका अ संघ

अशान प्रियंजन (कर्णधार), भानुका राजपाक्षा, पथुम निसंका, प्रियमल परेरा, संगीत कुरे, निरोशन डिकवेला, सदिरा समरविक्रम, लाहिरू कुमारा, दुष्मंत चामीरा, विश्‍वा फर्नांडो, चामीरा कुरूणारत्ने, लक्ष्मण सदाकन, अकीला धनंजय, कामिंदू मेंडिस.