Thu, May 23, 2019 23:09होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट सिटी’साठी यापुढे स्वतंत्र आयुक्‍त : खादर

‘स्मार्ट सिटी’साठी यापुढे स्वतंत्र आयुक्‍त : खादर

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:03AMबंगळूर : प्रतिनिधी

बेळगावसह राज्यातील 7 शहरांची स्मार्ट सिटी योजनेसाठी यापूर्वीच निवड झालेली आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या कामांना चालना देण्यासाठी यापुढे स्वतंत्र आयुक्‍तांची नियुक्‍ती करणार असल्याचे नगरविकास व गृहनिर्माणमंत्री यू. टी. खादर यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी योजनेची कामे रेंगाळली असून, त्या कामांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधीचा पुरवठा करूनही कामे सुरू झालेली नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यासाठीच स्मार्ट सिटी शहरासाठी स्वतंत्र आयुक्‍तांची नियुक्‍ती करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, असे खादर म्हणाले. 

स्मार्ट सिटीमधील प्रत्येक शहराला दरवर्षी 200 कोटी रुपयांचा निधी दिला जातो. परंतु, त्या निधीपैकी  थोडी रक्‍कम खर्च करण्यात आली आहे. आयुक्‍तांच्या नियुक्‍तीनंतर आता विकासकामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया गती घेणार आहे.        

बेळगाव शहरासाठी सध्या स्मार्ट सिटी लि. ही कंपनी स्थापन करण्यात आली असून महापालिका आयुक्त तिचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तथापि, महापालिका आणि स्मार्ट सिटीची कामे याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता स्वतंत्र आयुक्त नेमण्याचा निर्णय झाला आहे.