Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › निजद मंत्री, आमदारांवर प्राप्‍तिकर विभागाचे छापे

निजद मंत्री, आमदारांवर प्राप्‍तिकर विभागाचे छापे

Published On: Mar 29 2019 1:36AM | Last Updated: Mar 29 2019 12:01AM
बंगळूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच,  प्राप्‍तिकर खात्याने मंत्री, उद्योजक, कंत्राटदारांसह 20 जणांवर गुरुवारी छापे टाकले. मात्र, भाजप सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींसह काँग्रेस-निजद आघाडीतील नेत्यांनी येथील प्राप्‍तिकर कार्यालयासमोर निदर्शने केली.

बंगळूरसह म्हैसूर, मंड्या, हासन, चिक्‍कमगळूर, शिमोगा, कनकपूर अशा सुमारे 20 ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले. लघु पाटबंधारे मंत्री सी. एस. पुट्टराजू, सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे निकटवर्तीय, विधान परिषद सदस्य फारुक यांच्यावरही छापे पडले. 

मंत्री सी. एस. पुट्टराजू व त्यांच्या पुतण्याच्या कार्यालय आणि निवासावर  राखीव दलाच्या जवानांसह पहाटे 5 वा. छापे घालण्यात आले. बंगळुरात पॉपकॉर्न व्यापारी सिद्धीक सेठ याच्या निवासावर छापा घातला. मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या निकटवर्तीयांमध्ये त्याचा वावर असतो. मतदारांना वाटण्यासाठी त्याने रक्‍कम संग्रहित केल्याचा संशय आहे.