Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › राष्ट्रीय पक्षांची मराठी मतदारांमध्ये चाचपणी

राष्ट्रीय पक्षांची मराठी मतदारांमध्ये चाचपणी

Published On: Dec 20 2018 1:22AM | Last Updated: Dec 19 2018 9:21PM
बेळगाव : प्रतिनिधी

महापालिकेवर मराठी गटाची सत्ता आहे. अपवादानेच आजपर्यंत कन्नड गटाला महापौरपद मिळाले  आहे. 32 मराठी नगरसेवक कार्यरत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. येत्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार महापालिकेत कसे निवडून येतील, याची व्यूहरचना सुरु आहे. 

महानगरपालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची गृहित धरून  जनमत आजमावण्यासाठी आतापासून राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना भेटत आहेत. त्याप्रमाणे त्या मतदारांचे नाव व मोबाईल नंबर जमवित आहेत. तसेच तुम्ही कुणाला मतदान करणार, असेही विचारत आहेत. सूज्ञ मतदार या प्रश्‍नाचे उत्तर देत नाहीत. तथापि, महिला मतदारांकडून राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते उत्तरे मिळवून त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारांना आकर्षीत करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांकाचा उपयोग होणार आहे. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला तरी, बेळगावकर मनपाच्या निवडणुकीत मराठी उमेदवाराला जिंकून देण्यासाठी मतदान करणार हे गृहित धरुन  आहेत.

समिती भूमिका काय घेणार

मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षानी फिल्डींग लावली आहे. मात्र मराठी अस्मितेसाठी समिती कोणतीच हालचाल सध्या करेनाशी झाली आहे. मनपावर भगवा फडकावायचा असेल तर मराठी उमेदवारांनी एकाच छताखाली निवडणूक लढविणे गरजेचे आहे. माजी आमदार, माजी महापौर संभाजी पाटील यांच्यानंतर मनपावर मराठीचा वरचष्मा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरेजेचे आहे.