Sat, Jan 18, 2020 06:30होमपेज › Belgaon › कर्नाटकात २४ तासांत ‘मान्सून’ची दस्तक..?

कर्नाटकात २४ तासांत ‘मान्सून’ची दस्तक..?

Published On: Jun 16 2019 1:44AM | Last Updated: Jun 16 2019 1:44AM
बंगळूरः वृत्तसंस्था

आज येणार... उद्या येणार... असे करीत अखेर यंदाच्या हंगामातील ‘मान्सून’ येत्या 24 तासांत कर्नाटकमध्ये  दस्तक देणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या सूत्रांनी शनिवारी दिली.  कर्नाटकातील किनारपट्टी भाग आणि मलनाड परिसरात काही तासांत मान्सून डेरेदाखल होणार आहे. अर्थात, हा पाऊस जोरदार होणार नसून, हलक्या ते मध्यम स्वरूपात होण्याची शक्यता आहे.  मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असल्याने येत्या काही तासांमध्ये दक्षिण कर्नाटकातील काही भागांत आगमन होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उत्तर कर्नाटकातही मान्सून आगेकूच करील, असे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, मान्सून 20 जूनपासूनच   सक्रिय होणार आहे.