Sun, Dec 15, 2019 05:58होमपेज › Belgaon › चिकोडी मतदारसंघातील प्रमुख रेल्वे योजना त्वरित राबवावी : खा. जोल्‍ले

चिकोडी मतदारसंघातील प्रमुख रेल्वे योजना त्वरित राबवावी : खा. जोल्‍ले

Published On: Jun 29 2019 1:12AM | Last Updated: Jun 28 2019 10:21PM
चिकोडी : प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख रेल्वे योजना त्वरीत राबविण्यात यावी, अशी विनंती करुन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व राज्यमंत्री सुरेश अंगडींना प्रस्ताव  सादर केले.

संसदेतील कार्यालयात भेट घेउन सादर केलेल्या प्रस्तावात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी लोकसभा मतदारसंघातून हजारो लोक  कामाकरिता महाराष्ट्रातील अनेक शहरांकडे जातात. तसेच शेतकरी, व्यापारी, उद्योगपतींना माल वाहतूक व प्रवासी कमी भाडे व वेळेच्या बचतीमुळे अनेक लोक प्रवासी रेल्वे प्रवास पसंत करतात. त्यामुळे याचा रेल्वे खात्याला याचा लाभ होणार आहे.