Sat, Aug 24, 2019 09:55होमपेज › Belgaon › सत्तेवर आल्यास २४ तासांत गोहत्या बंदी : येडियुरप्पा

सत्तेवर आल्यास २४ तासांत गोहत्या बंदी : येडियुरप्पा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:34PMबेळगाव : प्रतिनिधी

भाजप सत्तेवर आल्यास 24 तासांत गोहत्या बंदी कायदा जारी करण्यात येईल. सर्व शेतकर्‍यांचे राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्ज माफ करण्यात येईल, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले. बेळगाव ग्रामीणचे आ. संजय पाटील यांच्या प्रचारार्थ हिरेबागेवाडी येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

बेळगाव शहरात बेकायदेशीर कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे.  रोज सुमारे 400 टन गोमांसाची अन्यत्र वाहतूक करण्यात येत असते.  हे कत्तलखाने बंद करून राज्य  गोहत्यामुक्त बनविण्यात येईल. आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेली भाग्यलक्ष्मी योजना सिध्दरामय्यांच्या राजवटीत राहून गेली. भाजप सत्तेवर आल्यास ही योजना पूर्ववत सुरू करण्यात येईल. सरकारी इस्पितळातून गरिबांना उपचार, औषधोपचाराची सोय करून देण्यात येईल. पहिली ते पदवी शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना हाती घेण्यात येईल, असे सांगितले.यावेळी खा. सुरेश अंगडी,  के.पी.नंजुंडी यांचीही भाषणे झाली.

उमेदवार आ. संजय पाटील म्हणाले, हिरेबागेवाडी येथे कत्तलखाना उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. याला आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध करूया. येडियुरप्पा हे शेतकर्‍यांचे नेते आहेत. त्यांना पाठिंबा देऊन सत्तेवर आणूया. सभेला आ. उमेश कत्ती, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आ. डॉ. विश्वनाथ पाटील, ईरण्णा कडाडी, माजी आम. एस. सी. माळगी आदी उपस्थित होते.