Sat, Aug 24, 2019 10:47होमपेज › Belgaon › पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 27 2018 11:07PMचिकोडी : प्रतिनिधी 

क्षुल्लक कारणामुळे  डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीचा खून करुन पतीने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नणदी येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली. रेश्मा चंद्रकांत बाबूराव चिनगे (वय 38) रा.नणदी असे पत्नीचे नाव  आहे, तर  चंद्रकांत चिनगे (वय 40) असे पतीचे नाव आहे.

नणदी येथे राहणारे रेश्मा व चंद्रकांत चिनगे या दांपत्यात वारंवार किरकोळ कारणावरुन भांडण होत असे. गुरुवारी सायंकाळी वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात होवून रागाच्या भरात चंद्रकांतने घरात असलेला दगडी पाटा  पत्नी रेश्माच्या डोक्यात घातला.  रक्तबंबाळ झालेल्या रेश्मा यांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांतने तेथून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिस उपाधिक्षक दयानंद पवार,  सदलगा पोलिस ठाण्याचे पीएसआय संगमेश दिडिगनाळ घटनास्थळी दाख़ल होवून पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा, मृतदेहाची उत्तरीय तपासणीसह कायदेशीर प्रक्रिया सुरु  करत पतीचा शोध सुरु होता. 

चंद्रकांतचा शोध सुरू असताना  शुक्रवारी सकाळी तो त्याच्याच शेता मृतावस्थेत आढळून आला. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी या दोन्ही पती पत्नींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

रेश्मा यांचे माहेर तालुक्यातील उमराणी असून 15 वर्षापूर्वी शेती व्यवसाय करणार्‍या चंद्रकांत यांच्याशी लग्न झाले होते. दांपत्यास एक मुलगा व एक मुलगी असून ते प्राथमिक शिक्षण घेत आहेत. शिवाय आई व वडील राहतात.