Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › बारावीचा निकाल आज होणार जाहीर

बारावीचा निकाल आज होणार जाहीर

Published On: Apr 15 2019 1:52AM | Last Updated: Apr 15 2019 12:02AM
बंगळूर : प्रतिनिधी

विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणार्‍या बारावीचा निकाल सोमवारी (दि. 15) जाहीर होणार आहे. सकाळी 11 वा. पदवीपूर्व परीक्षा प्राधिकरणाच्या (केईए) निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर दुपारी 12 वा. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाणार आहे.

यंदा पहिल्यांदाच सीईटी घेण्याआधी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मूल्यमापनानंतर ऑनलाईन गुणांची नोंदणी करण्याचा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाल्याने लवकर निकाल जाहीर करणे शक्य झाले. दरम्यान, निकाल लवकर जाहीर केल्यास सीईटीला विद्याथ्याची उपस्थिती कमी राहण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या परीक्षा प्राधिकरणाच्या बैठकीत सोमवारी निकाल जाहीर करण्याबाबत शिक्‍कामोर्तब झाले.