होमपेज › Belgaon › पालकमंत्रिपदी सतीश जारकीहोळी

पालकमंत्रिपदी सतीश जारकीहोळी

Published On: Mar 08 2019 1:42AM | Last Updated: Mar 08 2019 12:11AM
बेळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पालकमंत्रिपदी वनमंत्री सतीश जारकीहोळी यांची नियुक्‍ती झाली आहे. याबरोबरच रिक्‍त असणार्‍या जिल्हा पालकमंत्रिपदांवर नेमणुकांचा आदेश सरकारने जारी केला आहे.

रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपदावरुन डच्चू दिल्यानंतर पालकमंत्रिपद रिक्‍त होते. कोप्पळ जिल्ह्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षणमंत्री ई. तुकाराम यांच्यावर सोपविली आहे. गदग पालकमंत्रिपदी धर्मादाय आणि कौशल्यविकास मंत्री पी. टी. परमेश्‍वर नायक, गृहनिर्माण मंत्री एम.टी.बी. नागराज यांची बंगळूर ग्रामीण जिल्हा पालकमंत्रिपदी नियुक्‍ती झाली आहे.