Mon, Jan 20, 2020 09:23होमपेज › Belgaon › सरकारी कर्मचार्‍यांना चौथ्या शनिवारीही सुटी

सरकारी कर्मचार्‍यांना चौथ्या शनिवारीही सुटी

Published On: Jun 07 2019 1:49AM | Last Updated: Jun 07 2019 1:49AM
बंगळूर : प्रतिनिधी

सरकारी कर्मचार्‍यांना दुसर्‍या शनिवारी सुटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सहाव्या वेतन आयोगाने याबाबतची शिफारस सरकारकडे केली होती. 

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. बँकांना महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सुटी असते. त्याचप्रमाणे आता सरकारी कार्यालयांनाही सुटी देण्याचे ठरवण्यात आले आहे. त्याचवेळी बसव जयंती, कनकदास जयंती, महावीर जयंती, गुडफ्रायडे, महालया अमावस्या, इद ए मिलादच्या सुट्या रद्द करण्यात येणार आहेत. प्रासंगिक रजांची संख्या 15 वरून 12 वर आणण्याची शिफारस सहाव्या वेतन आयोगाने केली होती. पण, हा वादग्रस्त विषय असून त्यावर विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्‍त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ मधील कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काऊन्सेलिंग व्यवस्था जारी करण्याविषयी मसुद्याला मंजुरी देण्यात आली. बदली प्रक्रियेवेळी कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने काऊन्सेलिंग व्यवस्था आणण्यात येत आहे. यामुळे जागांचे जिल्हानिहाय समान वाटप होणार आहे.