Thu, Dec 05, 2019 20:44होमपेज › Belgaon › अंतर्गत मतभेद विसरून पक्षबांधणीला महत्त्व द्या

अंतर्गत मतभेद विसरून पक्षबांधणीला महत्त्व द्या

Published On: Jun 08 2019 1:51AM | Last Updated: Jun 08 2019 12:53AM
बंगळूर ः प्रतिनिधी 

पक्ष तसेच वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत मतभेद मिटवा. सर्वांनी काँग्रेसची नव्याने बांधणी करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे, असे मत केपीसीसीचे अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी केले. 

येथील केपीसीसी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पक्ष आणि वरिष्ठ नेते याबाबत पक्षातील कोणीही बोलू नका, अशी सूचना पक्षातील नेत्यांना केली आहे. माजी आमदार के. एन. राजण्णा यांना तशी सूचनादेखील दिलेली आहे. गुरुवारी राजण्णा यांना समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांच्या घरी बोलावून याबाबत सांगितले आहे. याबाबत त्यांनी माफी मागितली असल्याचेही गुंडुराव यांनी सांगितले. 

पक्षातील कोणीही नेता कोणाविरोधात बोलत असेल, ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही. त्या त्यावेळी प्रत्येकाला सूचना केली जाईल. यातूनही कोणी ऐकत नसेल, तर त्याच्याविरोधात पक्षाच्या शिस्तीनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही गुंडुराव यांनी दिला.