Sat, Sep 21, 2019 07:09होमपेज › Belgaon › स्तवनिधीत आजपासून महामस्तकाभिषेक

स्तवनिधीत आजपासून महामस्तकाभिषेक

Published On: Feb 06 2019 1:43AM | Last Updated: Feb 06 2019 1:43AM
निपाणी : प्रतिनिधी

स्तवनिधी येथील पार्श्‍वनाथ ब्रह्मचर्याश्रम (गुरुकुल) येथे श्री मद्देवाधिदेव 1008 भगवान पार्श्‍वनाथ महामस्तकाभिषेक सोहळा व पंचकल्याण महोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवस चालणार्‍या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम होतील.

2002 नंतर 16 वर्षांनी  महोत्सव होत असल्याने लाखावर भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी ध्वजारोहण, गर्भकल्याण कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात होईल. गुरुवारी जन्मकल्याण, शुक्रवारी दीक्षा कल्याण, शनिवारी केवलज्ञान तर रविवारी मोक्षकल्याण सोहळा, पार्श्‍वनाथ महामूर्तीस महाभिषेक घालण्यात येईल. 

सोहळ्यासाठी आचार्य वर्धमान सागर महाराज, चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी-श्रवणबेळगोळ, लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी-कोल्हापूर, समाधीस्थ जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी-नांदणी, जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी-नांदणी यांच्यासह साधुसंत, मुनीजन व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महामस्तकाभिषेक व पंचकल्याण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष  द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा), माजी खा. कल्लापाणा आवाडे, अरविंद बेडगे, माजी आ. वीरकुमार पाटील, डॉ. ए. ए. चौगुले, भरमू बेडगे, डी. सी. पाटील, बी. पी. पाटील, सनतकुमार आरवाडे, महावीर पाटील यांच्यासह  पार्श्‍वनाथ ब्रह्मचर्याश्रम (गुरुकुल) स्तवनिधीचे संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत.