Wed, Jun 19, 2019 08:30होमपेज › Belgaon › ‘स्वाईन फ्लू’चे 4 बळी

‘स्वाईन फ्लू’चे 4 बळी

Published On: Oct 12 2018 1:04AM | Last Updated: Oct 13 2018 1:15AMबंगळूर : प्रतिनिधी

दहा दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूचे चार बळी गेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या रोगाचा फैलाव झाला असून बेळगावात 18 जणांना याची लागण झाली आहे. दहा दिवसांमध्ये 155 स्वाईन फ्लू रुग्ण आढळले असून संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तुमकुर, रामनगर, बळ्ळारीसह बंगळूर ग्रामीणयेथील चौघांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत 416 रुग्णांना स्वाईन फ्लू झाला आहे. 4,750 संशयित रुग्णांचे स्वॅब चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. गतवर्षी 16,864 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले होते. 3,260 जणांना स्वाईन फ्लू झाला होता. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षण संस्था व इस्पितळ, तालुका, जिल्हा इस्पितळांसह सर्व सरकारी आरोग्य केंद्रामंध्ये टॅमी फ्लू गोळ्यांचा आवश्यक साठा करण्याची सूचना आरोग्य खात्याने दिली आहे. तसे परिपत्रक संबंधितांना पाठविण्यात आले आहे. जिल्हा इस्पितळांना पहिल्या टप्प्यात 12.5 लाख, तालुका इस्पितळांना 5 लाख, समुदाय आरोग्य केंद्रांना 1.5 लाख आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना 25 हजार रुपये अनुदान मंजूर केले आहे.