Tue, Jul 07, 2020 09:04होमपेज › Belgaon › आघाडी सरकार बरखास्त करा

आघाडी सरकार बरखास्त करा

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 12 2019 12:21AM
खानापूर : प्रतिनिधी

अल्पमतात आलेल्या राज्यातील निजद-काँग्रेसप्रणित मैत्री सरकारने जनतेचा विश्‍वास गमावला आहे. सत्ता टिकविण्यासाठी राज्यातील राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली असून सद्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे जनतेच्या लोकशाहीवरील विश्‍वासाला तडा गेला आहे. तो अबाधित राखण्यासाठी विनाविलंब सरकार बरखास्त करुन स्थिर प्रशासनासाठी नव्याने सार्वजनिक निवडणुका घ्याव्यात, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य शिवसेनेच्यावतीने राज्यपालांना देण्यात आले. राज्यातील जनता एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडली आहे. जगण्यासाठीही जनतेला संघर्ष करावा लागत असताना लोकहिताची शपथ घेवून सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींना मात्र त्यांच्या कर्तव्याचाच विसर पडला आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज्य अध्यक्ष कुमार हकारी, राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, सचिव मधुकर मुद्राडी, प्रविणकुमार कुंटोजमर, रुक्मांगद एस, विनय मालदकर, गिरीजा गणेश आदी उपस्थित होते.