Sun, Dec 15, 2019 06:17होमपेज › Belgaon › गोरक्षकांना सुरक्षा देण्याची मागणी

गोरक्षकांना सुरक्षा देण्याची मागणी

Published On: Jun 09 2019 1:23AM | Last Updated: Jun 08 2019 11:29PM
 खानापूर : प्रतिनिधी

गोरक्षा सेवेत कार्यरत असलेला कार्यकर्ता शिवू उप्पार याची आत्महत्या   संशयास्पद असून त्याच्या हत्येला   आत्महत्येचे स्वरुप दिले जात आहे . त्यामुळे पोलिस यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल तपास करुन गोरक्षकांना सुरक्षा पुरवावी,  अशी मागणी खानापुरातील   भाजप कार्यकत्यांनी तहसीलदारांकडे  निवेदनाव्दारे केली आहे. 

शिवू उप्पार हा कार्यकर्ता गोरक्षणासाठी अविरत झटत होता. गायींची कत्तल करुन गो मांस परराज्यात पाठवणार्‍यांना कडवा विरोध करणार्‍या 19 वर्षीय उप्पारला धमकीचे फोन वारंवार येत होते. त्याच दरम्यान त्याची आत्महत्या झाल्यामुळे संशय व्यक्‍त होत आहे.   गोमातेच्या रक्षणार्थ काम करणार्‍या कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे. त्यांना संरक्षण मिळावे असे निवेदनात म्हटले आहे. 
 उपतहसीलदार व्ही. मोहन यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, प्रमोद कोचेरी, सुरेश देसाई, शरद केशकामत, संजय कुबल, जोतिबा रेमाणी, राजेंद्र रायका, राजू सिद्धाणी,  बाबुराव देसाई, तालुका भाजप अध्यक्ष विठ्ठल पाटील  आदी उपस्थित होते.