Tue, Dec 10, 2019 14:08होमपेज › Belgaon › मुलीला भेटून परत येणार्‍या आईचा मृत्यू

मुलीला भेटून परत येणार्‍या आईचा मृत्यू

Published On: Feb 19 2019 1:14AM | Last Updated: Feb 19 2019 12:03AM
बेळगाव : प्रतिनिधी

काकती येथे महामार्ग क्र.4 वर रविवारी रात्री झालेल्या अपघातात बैलहोंगल येथील महिला ठार झाली. मजमुनिसा महम्मदशिराज अंकलगी (वय 56, रा. बैलहोंगल) असे महिलेचे नाव आहे. 

काकती येथे विवाह करून दिलेल्या आपल्या मुलीला भेटण्यास मजमुनिसा आल्या होत्या. परत त्या आपल्या गावी रात्री 8.30 वा. जात असताना महामार्गावर रस्ता ओंलांडताना भरधाव ट्रकने ठोकरल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपयोग झाला नाही.

वाटेतच मृत्यू झाला. घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली असून महिलेला धडक दिलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमनी तपास करीत आहेत.