बेळगाव : प्रतिनिधी
क्रिकेट खेळताना झालेल्या वादावादीतून एकट्याला जबर मारहाण केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सौरव आनंद निलकेरी (रा. हनुमान नगर) असे फिर्याद दाखल केलेल्याचे नाव आहे.
यावरून श्रीनाथ आनंद ओबय्या (वय 24, रा. हनुमाननगर) सम्मु ऊर्फ सॅमसन मोजस इम्यानुअल (22) शिवानंद आनंद ओबय्या (26), मारुती कल्लाप्पा मनोळी (22), विशाल आनंद ओबय्या (26, सर्व जण रा. हनुमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कांही दिवासांपुर्वी क्रिकेट खेळताना वादावादी झाली होती. यावरुन सौरव याला त्याच्या घरात घुसून पाचजणांनी मारहाण करुन गळा दाबुन मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार एपीएमसी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. यावरुन पोलिस निरिक्षक कालिमीर्ची यांनी कारवाई करुन अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.