Sun, Dec 15, 2019 05:56होमपेज › Belgaon › काँग्रेस जनतेचा काळजीवाहक : राहुल गांधी

काँग्रेस जनतेचा काळजीवाहक : राहुल गांधी

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:14AMकारवार : प्रतिनिधी

केंद्रातील भाजप सरकार जातीयतेचे राजकारण करीत आहे, धर्माच्या नावावर समाजात फूट पाडत असून, त्यांच्यापासून जनतेने वेळीच सावध व्हावे. जनतेची काळजी वाहणारा आणि  देशाच्या विकासाचा ध्यास घेणारा काँग्रेस हाच एकमेव पक्ष असून आम्हाला आणखी एकवेळ आशीर्वाद  देऊन सत्तेवर आणा, असे आवाहन अ.भा. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल यांचे गुरुवारी कारवार जिल्ह्यात आगमन झालेे. दुपारी अंकोल्यात त्यांनी रोड शोद्वारे प्रचार केला. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, काँग्रेस धर्मनिरपेक्षतेने कार्य करीत आला आहे. सर्व जाती? धर्मातील जनतेला विश्‍वासात घेऊन जाणारा पक्ष केवळ काँग्रेस आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले,   उमेदवार आमदार सतीश सैल यांनी कारवार?अंकोला मतदारसंघाच्या विकासासाठी 1600 कोटी रुपये निधी मिळवला. इतकी कामे यापूर्वी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने या मतदारसंघात केलेली नाहीत. मागील निवडणुकीच्यावेळी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता आम्ही केली आहे. या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा संधी द्या.

 रोड शो व्यापक बंदोबस्तात 

राहुल यांचे गोवा येथून  हेलिकॉप्टरने दुपारी अंकोल्यात आगमन झाले. भेंडीबाजारमधून त्यांचा रोड शो सुरू झाला. दीड कि.मी. रोड शोमध्ये राज्य निवडणूक प्रमुख के. सी. वेणुगोपाल, लोकसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री आर. व्ही. देशपांडे, आ.सतीश सैल, यल्लापूरचे उमेदवार शिवराम हेब्बार सहभागी झाले होते. शहरात व्यापक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गर्दी झाली होती. अंकोला सभेनंतर राहुल गांधी कुमठ्याकडे रवाना झाले. गुरुवारी त्यांची मंगळूरमध्ये सभा आहे.

Tags : congress, BJP, rahul gandhi, karnataka election