Sun, Dec 08, 2019 21:46होमपेज › Belgaon › अटींना आव्हान

अटींना आव्हान

Published On: Nov 01 2018 1:15AM | Last Updated: Nov 01 2018 1:15AMबेळगाव : प्रतिनिधी 

काळा दिन सायकल फेरीआधी म. ए. समिती नेत्यांविरोधात बजावलेल्या जाचक अटींंना समिती नेत्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. बुधवारी त्यांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. यावर 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय मानव आयोगाकडे याचिका दाखल करण्यात येणार आहे.

काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून मुस्कटदाबी सुरू आहे.  म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, ता. म. ए. समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांच्याकडून प्रत्येकी पाच लाखांचे म्हणजेच एकूण 20 लाखांची वैयक्‍तिक हमीपत्रे देण्याची सूचना पोलिस आयुक्‍तालयाने 30 रोजी मध्यवर्ती समितीकडे केली होती.