Sat, Dec 14, 2019 05:38होमपेज › Belgaon › पंधरा वर्षीय मुलाने केले ‘एप्रिल कूल’!

पंधरा वर्षीय मुलाने केले ‘एप्रिल कूल’!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : शिवाजी शिंदे

उन्हाळा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि वर्षागणिक तापमान उच्चांक गाठते आहे. त्यामुळे यंदा ‘एप्रिल फूल’ करण्याऐवजी ‘एप्रिल कूल’ करा असा संदेश वॉटसअ‍ॅपवरून फिरत होता. तो किती जणांनी गांभीर्याने घेतला हा चर्चेचा मुद्दा. पण एका 15 वर्षीय मुलाने मात्र त्याच संदेशापासून धडा घेऊन खरोखर ‘एप्रिल कूल’ करण्याचा प्रयत्न केला आहे. अतुल गडकरी असे त्याचे नाव. त्याने आपल्या घरात रविवारी एप्रिलच्या पहिल्या दिवशी रेनवॉटर हार्वेस्टिंग करून बंद पडलेली कूपनलिका पुनरुज्जीवित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठीचे बरेचसे खोदकामही त्यानेच केले!

रविवारी अतुलने आपल्या वडिलांकडे आग्रह धरून आपल्या घरी हा प्रकल्प राबवला आणि छताचे सारे पाणी अंगणात जिरवण्यासाठी खड्डा खोदला. तसेच ते  बुजवलेल्या बोअरवेलमध्ये सोडण्याची व्यवस्था केली. वॉटसअ‍ॅपवरून संदेश तर सगळेच पाठवतात. पण बरेच लोक ते वाचतात, आणि सोडून देतात. आपण तरी काहीतरी करावे, असे अतुलच्या मनात आले आणि मग त्याने छतावरचे पाणी बंद बोअरवेलमध्ये मुरवण्याची कल्पना मांडली आणि त्यासाठी आग्रहही धरला. त्यामुळे आम्ही तयार झालोे, अशी माहिती प्रकाश गडकरी यांनी दिली.

आधी परसात 325 फूट खोदलेल्या बोअरवेलला पाणी लागले नव्हते. त्यामुळे दगडांनी बोअरवेल बुजवली होती. विजापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी बोअरवेलमध्ये पडून एका बालकाचा अंत झाल्यानंतर सरकारने कोरड्या बोअरवेल बुजवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ही बोअरवेलही बुजवली होती. त्याच बोअरवेलमध्ये पावसाचे पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

बोअरवेलमध्ये 100 फुटांवर पाणी

महत्त्वाचे म्हणजे छतावरचे पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यासाठी चर खोदून ती बोअरवेलला जोडताना बुजवलेली बोअरवेल पुन्हा गडकरी यांनी खुली केली असता बोअरवेलमध्ये 100 फुटांवर पाणी होते. त्यामुळे दुहेरी लाभ झाल्याची भावना गडकरी परिवारामध्ये आहे.


  •