Mon, Aug 19, 2019 02:33होमपेज › Belgaon › प्रकाश हुक्केरी यांचा अर्ज दाखल

प्रकाश हुक्केरी यांचा अर्ज दाखल

Published On: Apr 04 2019 1:51AM | Last Updated: Apr 03 2019 11:55PM
चिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खा. प्रकाश हुक्केरींनी आपला उमेदवारी अर्ज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदार, माजी आमदार व शेकडो कार्यकर्त्यांसह दाखल केला.

शहरातील मिनी विधानसौध येथील कार्यालयात चिकोडी लोकसभा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र के.व्ही. यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आमदार गणेश हुक्केरी, आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. अंजलीताई निंबाळकर, आ. महेश कुमठळ्ळी, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, माजी आ. विरकुमार पाटील, ए. बी. पाटील, काकासाहेब पाटील, श्याम घाटगे, दिग्विजय पवार देसाई, उपाध्यक्ष अरुण कंटाबळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सतीश कुलकर्णी, महावीर मोहिते, अनिल पाटील यांच्यासह चिकोडी लोकसभा व्याप्तीतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उपस्थित होते.