Tue, Aug 20, 2019 09:17



होमपेज › Belgaon › मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज खानापूर, बेडकिहाळमध्ये

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज खानापूर, बेडकिहाळमध्ये

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 12:39AM



बेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोन स्टार प्रचारकांच्या सभा होतील. निपाणीचे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी बेडकिहाळमध्ये तर खानापुरातील काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खानापुरात अशा दोन सभा मुख्यमंत्री घेतील. तर स्मृती इराणींची सभा बैलहोंगलमध्ये होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची बेडकिहाळची सभा सकाळी 11 वाजता तर खानापूरची सभा सायंकाळी 7 वा. होईल. खानापुरातील जांबोटी रस्त्यावरील मलप्रभा क्रीडांगणावर ही सभा होईल. सिद्धरामय्या पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला भेट देत आहेत. 

शुक्रवारी सायंकाळी डॉ. अंजली निंबाळकर व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सभास्थळाला भेट देऊन नियोजनाची पाहणी केली.