Sat, Jan 18, 2020 23:18होमपेज › Belgaon › राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ : मुख्यमंत्री सिध्दरामय्या 

राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ : मुख्यमंत्री सिध्दरामय्या 

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:09AM

बुकमार्क करा

जमखंडी : वार्ताहर     

 कर्नाटकात आमच्या बाजूनेच लाट आहे. आम्ही दिलेल्या आश्‍वासनांचे पालन केले आहे.  अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. अनेक योजना राबवून त्यांचा सर्व स्तरातील जनतेला लाभ मिळवून दिला आहे. नंजनगुड, गुंडलपेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या विजयाने हे सिध्द केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत यांसह अन्य खात्यांच्या सहयोगाने जमखंडी विधानसभा मतदारसंघात विविध योजनांचे उद्घाटन, विविध योजनांसाठी पायाभरणी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आली. त्यानंतर जी. जी. मैदानात आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

आपल्या सरकारच्या कार्याची माहिती देताना सिध्दरामय्या यांनी, आरोग्यभाग्य योजना सुरू करून नागरिकांना सरकारी व खासगी इस्पितळातून सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आपण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच  अन्नभाग्य, क्षीरभाग्य, भाग्यज्योती योजना सुरू केल्या. महामंडळांकडून कर्ज घेतलेल्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले. पाटबंधारे योजनेला प्राधान्य दिले. चार वर्षांत अनेकांना रोजगार मिळवून दिला.  गुंतणूकदारांना प्राधान्य देऊन औद्योगिक क्षेत्रात 11 व्या स्थानावर असलेले कर्नाटक प्रथम क्रमांकावर आणले. सर्व जाती, धर्माकडे समानतेने पाहणारा काँग्रेस हा एकमेव  पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ ने गरिबांचे पोट भरत नाही,  अशी टीका करून आपला पक्ष ‘काम की बात’ करणारा असल्याचे सांगितले.

राज्य भूकमुक्त करण्यासाठी साडेचार कोटी जनतेला सात किलो तांदूळ मोफत देत आहे.  अल्प दरात  उपाहार देण्यासाठी इंदिरा कँटिन सुरू करण्यात आले. आलमट्टी धरणाची उंची 519 फुटावरून  वरून 524 फुटापर्यंत वाढविण्यात आली. सभेला जिल्हा पालकमंत्री आर.बी.तिम्मापूर, आम. एस.आर.पाटील,आ. एच.वाय.मेटी, जि.पं. अध्यक्षा वीणा काशप्पनवर, नगराध्यक्ष राजू पिसाळ, जिल्हाधिकारी.मेघण्णवर, जिल्हा पोलिस प्रमुख रिष्यंत उपस्थित होते.