Thu, May 23, 2019 22:28
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › फिटनेस अतिशय महत्त्वाचा; पण स्वतःपेक्षा राज्याचा

फिटनेस अतिशय महत्त्वाचा; पण स्वतःपेक्षा राज्याचा

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:08AMबंगळूर : प्रतिनिधी

शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिजिकल फिटनेस अतिशय महत्त्वाचा आहे; पण स्वतःच्या फिटनेसपेक्षा राज्याचा फिटनेस अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून कर्नाटकाचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. तसेच दोन मिनिटांचा शारीरिक व्यायाम करण्याचा व्हिडीओही कुमारस्वामींना पाठविला आहे. त्याबद्दल  कुमारस्वामींनी स्वागत करून ट्विटला तातडीने प्रतिसाद दिला. राज्याचा विकास घडवून आणण्याकरिता शारीरिक तंदुरुस्ती खूपच महत्त्वाची आहे, याची मला पूर्ण जाणीव असून, त्याकरिता दररोज मी योगासने आणि व्यायामही करीत आहे, असे त्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांना कळविले आहे. कर्नाटक राज्याचा विकास महत्त्वाचा असल्याने आपले सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही कुमारस्वामींनी स्पष्ट केले.

आपण दररोज चालण्याचा व नियमित योगासनाचा सराव करीत आहे. आपल्या निवासस्थानामधील उद्यानामध्ये दररोज प्राणायामही करीत असल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरद्वारे कळविले आहे.