Mon, Aug 19, 2019 03:06होमपेज › Belgaon › सेल्फी व्हिडीओ बनवून प्रियकराची आत्महत्या

सेल्फी व्हिडीओ बनवून प्रियकराची आत्महत्या

Published On: Nov 14 2018 10:45PM | Last Updated: Nov 14 2018 10:43PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रेयसी असणार्‍या तरुणीच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपयांची मागणी करत नाहक त्रास दिल्याने प्रियकराने सेल्फी व्हिडीओ काढत विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बैलहोंगल तालुक्यातील कोरवीनकोप्प येथे उघडकीस आला. 

मंजुनाथ येणगी (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे गेल्या काही वर्षापासून गावातीलच एका तरुणीवर प्रेम जडले होते. गेल्या काही महिन्यांपासून सदर बाब प्रेयसीच्या कुटुंबियांना समजली. यानंतर तिच्या कुटुंबियांनी मंजुनाथला वारंवार 10 लाखांची मागणी करीत त्रास देण्यात आला. याला कंटाळून त्याने 7 लाख रु. ची जोडणी करून पैसेही दिले आहेत. तरीही त्या तरुणीच्या कुटुंबीयांकडून सातत्याने मानसिक छळ सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून मंजुनाथ प्रचंड तणावाखाली वावरत होता. अशा स्थितीत मंजुनाथने सेल्फी व्हिडीओ सुरू ठेऊन विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस स्थानकात दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे.