होमपेज › Belgaon › बेळगाव-हैदराबाद थेट विमानसेवा २५ मार्चपासून?

बेळगाव-हैदराबाद थेट विमानसेवा २५ मार्चपासून?

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 12:03AM



बेळगाव : प्रतिनिधी

स्पाईसजेटची बेळगाव ते हैदराबाद थेट विमानसेवा दि. 25 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बेळगावहून हैदराबादला चेन्‍नई मार्गे जावे लागत होते. त्यासाठी तब्बल 3 तास 40 मिनिटे अवधी लागत होता. आता थेट विमानसेवेमुळे 1 तास 10 मिनिटांत हैदराबादला पोहोचता येईल. 

आता नवीन विमानसेवा सुरू झाल्यास हैदराबादहून विमान 10.15  वा.  उड्डाण करेल.  ते बेळगावला 11.25 वा. पोहोचेल. बेळगाव येथून विमान 11.45 वा. उड्डाण करून  12.55 वा.  हैद्राबादला पोहोचेल. सूत्रांनी माहिती दिली असून काही दिवसांत या  निर्णयावर शिक्‍कामोर्तब होईल. सध्या बेळगावमधून मुंबई आणि बंगळूरला थेट विमानसेवा आहे. ती इतर शहरांनाही विस्तारित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.