Mon, Sep 16, 2019 03:33होमपेज › Belgaon › भाजपकडून आघाडीचे आमदार वेठीस : गुलामनबी आझाद

भाजपकडून आघाडीचे आमदार वेठीस : गुलामनबी आझाद

Published On: Jul 11 2019 1:29AM | Last Updated: Jul 11 2019 12:51AM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस आणि निजदमधील आमदारांना वेठीस धरुन आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. याद्वारे लोकशाही व्यवस्थेवर घाला घालण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी केला.

येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या भाजपकडून होत असलेली वर्तणूक लोकशाहीसाठी मारक आहे. त्या पक्षाकडून लोकशाहीचा अनादर केला जात आहे. पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार मुंबईत असणार्‍या आघाडीच्या काही आमदारांना भेटण्यासाठी गेले होते. पण, तेथील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. खासगी हॉटेलमध्ये फिरावयास कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. महाराष्ट्रातील भाजप सरकारने पूर्वनियोजितपणे शिवकुमारना ताब्यात घेतले.

रामलिंगा रेड्डींचा राजीनामा हा काँग्रेसमधील अंतर्गत विषय आहे. पक्षांतर्गत समस्यांवर पक्ष पातळीवर चर्चा करुन त्या सोडवल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.