Mon, Aug 19, 2019 02:45होमपेज › Belgaon › एशियन फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धा : भारताला दुसरे सर्वसाधारण विजेतेपद

एशियन फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धा : भारताला दुसरे सर्वसाधारण विजेतेपद

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 11 2018 11:02PMबेळगावः प्रतिनिधी 

इराण येथील  तेहरान कुराज  येथे आयोजित एशियन कुस्ती स्पर्धेत फ्रिस्टाईलमध्ये  भारतीय कुस्ती संघाने 1 सुवर्ण, 3 रौप्य, 4 कास्य अशा  8 पदकांसह  दुसरे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.या स्पर्धेत आशिया खंडातील 10  देशांनी भाग घेतला. 38 किलो गटात अनिलने कास्यपदक पटकाविले. अनिलला इराणच्या कुस्तीपटूंकडून उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागला. 

44 किलो गटात चिरागने कास्यपदक पटकाविले. त्याला जपानच्या कुस्तीपटंकडून उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली. 52 किलो गटात अमानने सुवर्ण पदक पटकाविले. त्याने जपानच्या कुस्तीपटूचा 8-6 असा पराभव करत भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. 

57 किलो गटात कर्नाटकच्या महेश कुमारने रौप्यपदक, 62 किलो गटात परविंद्र सिंगने रौप्य पदक  पटकाविले.  68 किलो गटात करणने रौप्यपदक पटकाविले. 75 किलो गटात  विठ्ठलने कास्यपदक पटकाविले. उपांत्य फेरीत इराणच्या कुस्तीपटंकडून त्याला हार मानावी लागली. 85 किलो गटात विकासने कास्यपदक पटकाविले.  

भारताने 1 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कास्यपदकांची कमाई केली. भारताने 22 गुणासह दुसरे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संघाला दुसरे सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक देऊन गौरविण्यात आले.  या कामगिरीची दखल घेऊन विश्‍व कुस्ती स्पर्धेत यातील कुस्तीपंटूची निवड होण्याची शक्यता आहे.