Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › दीडशे कोटींचा विकासनिधी मंजूर : खा. प्रकाश हुक्केरी

दीडशे कोटींचा विकासनिधी मंजूर : खा. प्रकाश हुक्केरी

Published On: Mar 05 2019 1:46AM | Last Updated: Mar 04 2019 11:24PM
चिकोडी : प्रतिनिधी

खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात सुमारे 150 कोटींची विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक निधी मंजूर झाल्याची माहिती खा. प्रकाश हुक्केरी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

निपाणीत हायटेक बसस्थानकासाठी 5 कोटी, निपाणी सहकारी औद्योगिक परिसर विकासासाठी 6 कोटी, निपाणी पालिकेसाठी एस.एस.पी. विशेष अनुदान 4 कोटी, चिकोडी तालुक्यातील बोरगाव नगर पंचायतीत पायाभूत सुविधांसाठी 1 कोटी, कारदगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी 1.12 कोटी, भोज-कारदगा (ता. चिकोडी) येथे दूधगंगा नदीवर पूल बांधण्यासाठी 10 कोटी, यरनाळ, हंचिनाळ, ढोणेवाडी, सिदनाळ, जैनवाडी, बुदिहाळ, शिरदवाड  त्याचप्रमाणे रायबाग तालुक्यातील बेक्केरी, हंदीगुंद, कप्पलगुद्दी, खेमलापूर, कुडची (ग्रामीण), सिद्दापूर, यल्‍लारट्टी, यरबट्टी आणि कोळीगुड्ड येथे शुद्ध पाणीपुरवठा केंद्रांसाठी प्रत्येकी 12 लाख मंजूर करण्यात आले आहेत.

निपाणीत राजा शिवछत्रपती कन्व्हेन्शन सेंटरसाठी 1 कोटी, बोरगाव हायटेक बस स्थानक 2.30 कोटी, हारुगेरी येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन कमिटी समुदाय भवन बांधकामासाठी 99 लाख रुपये मंजूर केले आहेत. कुडची (ता. रायबाग) येथे कृष्णा नदीवर पूल बांधण्यासाठी 50 कोटी, कुडची येथे गुंडवा, हिडकल आणि निलजी येथे अनुसूचित जाती कॉलनीत रस्ता, गटारींसाठी 40 लाख रुपये मंजूर करण्यात केले आहेत.

कुडचीतील प्रभाग क्र. 2, 4, 5, 6, 9, 10, 11, 13, 14, 15, 18, 20, 21 आणि 22 येथील अल्पसंख्याक कॉलनीत विकासासाठी  1 कोटी, रायबाग येथे रस्ता, गटारींसाठी 2.5 कोटी, जेसीएस ते नसलापूरपर्यंतच्या 2.5 कि. मी. अंतराच्या विकासासाठी 1 कोटी, अथणीतील लक्ष्मीवाडी, उप्पारवाडी, मंगसुळी, चिकोडी तालुक्यातील अरबॅनवाडी, ऐगळी, हिरेकोडी, शमनेवाडी, खडकलाट, पीरवाडी, वाळकी, येडूर, हुक्केरी तालुक्यातील हंजिनाळ, सलामवाडी, बस्तवाड, कणगला, मदिहळ्ळी, येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या केंद्रांसाठी 12 लाख रुपये, कागवाड-कलादगी एस. एच. 53 वर अ‍ॅप्रोच रस्त्यासाठी 5 कोटी, हुक्केरीत हायटेक बस स्थानकासाठी 5 कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.