Tue, Dec 10, 2019 13:45होमपेज › Belgaon › बेळगावच्या चौघांना जीवदान

बेळगावच्या चौघांना जीवदान

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 12:43AM
कारवार : प्रतिनिधी  

गोकर्ण येथील ओम बिचवर समुद्रात बुडणार्‍या बेळगावच्या चार पर्यटकांचे प्राण जीवरक्षकांनी वाचवल्याची घटना सोमवारी घडली आहे. बेळगावमधील एक कुटुंब सहलीसाठी गोकर्ण येथे आले होते. या कुटुंबातील काही सदस्य पोहण्यासाठी समुद्रात उतरले.

या कुटुंबातील 14 वर्षीय मुलगा हुसेन हा समुद्रातील भोवर्‍यात सापडून बुडत असल्याचे पाहून त्याच्या कुटुंबातील सदस्य शहजाद (26), अब्दुल्ला (20) आणि बेपारी (40) यांनी हुसेनच्या बचावासाठी समुद्रात उडी घेतली. यातील कुणालाही समुद्रात पोहता येत नसल्याने तेही समुद्रात बुडू लागले. यावेळी घटनास्थळी असलेले जीवरक्षक दलाचे सदस्य पांडुरंग अंबिग आणि प्रवासी मित्र सतीश नाईक यांनी धाव घेतली. बुडणार्‍या चौघांनाही सुखरूपणे बाहेर काढले. आपले प्राण वाचवल्याबद्दल संकटातून वाचलेल्या कुटुंबीयांनी पांडुरंग आणि सतीश यांचे आभार मानले.