Thu, Dec 05, 2019 20:43होमपेज › Belgaon › भरधाव कारला अपघात: दोघे जण जखमी

भरधाव कारला अपघात: दोघे जण जखमी

Published On: Apr 18 2018 12:47AM | Last Updated: Apr 18 2018 12:32AMबेळगाव : प्रतिनिधी

बागेवाडीकडून बेळगावकडे भरधाव वेगाने जाणार्‍या कारला सुवर्णसौध येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर  अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.  कार  उलटून सर्व्हिस रोडवरील दुभाजकावर कलंडली. यात अनिल कुमार व अभिषेक  हे जखमी झाले आहेत. कारचालक साजीद सय्यद मुतगे हा किरकोळ जखमी झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच बागेवाडी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
भरधाव जाणार्‍या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे बागेवाडी पोलिसांकडून  सांगण्यात येत आहे. अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कार उलटून महामार्गाशेजारील  सर्व्हिस रोड दुभाजकावर कलंडली होती. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.  
घटनास्थळी महामार्गाजवळील हलगा, बस्ताड येथील नागरिकांसह वाहनचालकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची नोंद बागेवाडी पोलिस स्थानकात झाली आहे. 

Tags : car accidents:; both ,injured,,belgaon news