Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › तिघा बंडखोरांविरुद्ध एसीबी छापे शक्य

तिघा बंडखोरांविरुद्ध एसीबी छापे शक्य

Published On: Jul 13 2019 1:37AM | Last Updated: Jul 13 2019 12:06AM
बंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडीतून बाहेर पडून पदाचे राजीनामे दिलेल्या तीन आमदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) कारवाई करण्याचा विचार सरकारने चालवला आहे. एस. टी. सोमशेखर, भैरती बसवराज आणि मुनीरत्न यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

या तिघांनी राजीनामे देऊन मुंबई गाठली आहे. तेथील रिसॉर्टमध्ये इतरांबरोबर त्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा मनधरणी केली तरी ते परतले नाहीत. इतर मार्गाने त्यांचा राजकीय सूड घेण्याची तयारी आघाडीकडून होत आहे. बंगळूर मनपातील सत्तारुढ पक्षाचे नेते एन. आर. रमेश यांनी या तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. या तिघांनी 110 गावांसाठी राखीव ठेवलेल्या अनुदानात भ्रष्टाचार केला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या अनुदानाचा गैरवापर, बेकायदा वसाहत, बांगलादेशी नागरिकांना मतदान ओळखपत्र देणे, विविध खात्यात भ्रष्टाचार असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली आहे. या तिघांविरुद्ध तपास करुन गुन्हा नोंदवण्याची सूचना देण्यात येणार आहे.