Tue, Aug 20, 2019 09:02होमपेज › Belgaon › दीड लाख लोकसंख्येसाठी ९५ टँकर

दीड लाख लोकसंख्येसाठी ९५ टँकर

Published On: May 08 2019 1:56AM | Last Updated: May 08 2019 1:56AM
बेळगाव : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने हात दिल्याने जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. दिवसे दिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. आता जिल्ह्यातील 82 गावातील 1 लाख 64 हजारहून अधिक नागरीकांना 95 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत दुष्काळावर 10 कोटी खर्च करण्यात आले असून 10 कोटीची तरतूद करण्यात आली असलीतरी हा निधी कमी पडला आहे. यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत 19 टक्के कमी पाऊस पडला. यामुळे अथणी, सौंदत्ती आणि रामदुर्ग हे तीन तालुके खरीप हंगामामध्येच दुष्काळी तालुके म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर रब्बी हंगाम पूर्णपणे कोरडा गेल्याने संपूर्ण बेळगाव जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यामध्ये जानेवारीच्या सुरुवातीपासूनच टँकरची मागणी होऊ लागली. आता टँकरच्या संख्येत दिवसे दिवस वाढ होत आहे.जानेवारीमध्ये जिल्ह्यात दोन टँकर सुरु होते ते आता 95 पर्यंत पोहचले आहेत. बेळगाव जिल्ह्यात आज 82 गावातील 16 लाख 4 हजार 607 लोकसंख्येला 95 टँकरद्वारे 343 खेपांनी पाणी देण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 14 खासगी विहीर अधिगृहीत करण्यात आले आहेत. जनावरांच्या चार्‍यासाठी 25 चारा धावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामधील 24 छावण्या या अथणी तालुक्यात आहेत तर एक छावणी चिकोडी तालुक्यात सुरु करण्यात आली आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील दुष्काळाला तोंड देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये दहा कोटीचा निधी वितरीत करण्यात आला होता तो खर्च झाल्याने पंधरवड्यात अणखी दहा कोटीचा निधी वितरीत करण्यात आला आहे. हा निधीही आता कमी पडला असून, अणखी निधीची मागणी करण्यात येणार आहे. अनेक ठिणाणी तात्पुरता नळपाणी योजना सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बोअरवेल मारण्याचेही काम सुरु आहे. कृष्णा नदीला पाणी सोडण्यात आलेल नसल्यामुळे पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे.