Sat, Jan 18, 2020 06:50होमपेज › Belgaon › बिदरला छत कोसळून 6 ठार

बिदरला छत कोसळून 6 ठार

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 27 2019 12:19AM
गुलबर्गा : प्रतिनिधी

पावसामुळे जीर्ण झालेल्या घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील सहाजण ठार झाले. बिदरमधील बसव कल्याण तालुक्यातील चिल्‍ला गल्‍ली वसाहतीत बुधवारी (दि. 26) ही दुर्घटना घडली.

नदीम शेख (45), फरिदा बेगम (34), आयेशा बानू (15), महेताबी (15), फरहान अली (4), फैयाज खान (6) अशी मृतांची नावे आहेत. अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या घरात या कुटुंबाचे वास्तव्य होते. छताची भिंत मातीची होती. बिदरसह आसपासच्या परिसरात मंगळवारी (दि. 25) जोरदार पाऊस झाला. यामुळे जीर्ण झालेल्या घराचे छत खिळखिळे झाले. रात्री झोपी गेलेल्या कुटुंबीयांवर छत कोसळले. यामध्ये घरातील सर्व सहाजण ठार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रहिवाशांच्या मदतीने छताचा ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढले. बसव कल्याण पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.