Wed, Jun 26, 2019 01:11होमपेज › Belgaon › ३५ लाखांचे स्पिरीट संकेश्‍वरजवळ जप्त

३५ लाखांचे स्पिरीट संकेश्‍वरजवळ जप्त

Published On: Mar 24 2019 1:17AM | Last Updated: Mar 24 2019 1:17AM
संकेश्‍वर : गोव्याहून कर्नाटकात येणारा स्पिरीट व मद्याचा ट्रक शनिवारी बुगटे आलूरजवळ (ता. हुक्केरी)येथे दुपारी 12 वाजता संकेश्‍वर अबकारी विभागाने पकडला. त्यामध्ये असणारे 8 हजार लिटर स्पिरीट, साडेपाच लिटर ब्रँडी जप्त केली असून, या मुद्देमालाची किमत 35 लाख 21 हजार रु. आहे. 

तसेच 10 लाख किमतीचा ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. युनुसबेग इनामदार (वय 37, रा. मसूरगुप्पी, ता. हुक्केरी) आणि अंकुश बर्डे, (साईनगर, लातूर) अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव अबकारी विभागाचे डॉ. वाय. मंजुनाथ आणि डी. सी. अरुणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक होनाप्पा ओलेकर, उपनिरीक्षक सुनील कल्लूर, बसवराज कित्तूर, टी. डी. गार्डे, मदली यांच्या पथकाने ही कारवाई केली.