Sat, Dec 14, 2019 05:40होमपेज › Belgaon › कर्नाटकात मतदारसंघ 224, उमेदवार 2,655

कर्नाटकात मतदारसंघ 224, उमेदवार 2,655

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:34AMबंगळूर ः प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा आखाडा सज्ज झाला असून 224 जागांसाठी 2,655 उमेदवार रिंगणात आहेत.  

2,436 पुरुष व 219 महिला उमेदवार यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. भाजप 224, काँग्रेस 222, निजद 201 आहेत. बसपाने 18 मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले आहेत. मूळबागिलू मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे 39 उमेदवार रिंगणात आहेत. तर गुलबर्गा जिल्ह्यातील सेडम आणि चळ्ळीकेरीमधून केवळ 4 उमेदवार  आहेत.

एकूण 3, 509 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 271 अर्ज अवैध ठरले आहेत.593 जणांनी माघार घेतली आहे.

23 मतदारसंघांत 15 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघातून दोन मतदानयंत्रे वापरण्यात येतील. सर्वाधिक उमेदवार असलेल्या मूळबागिलू मतदारसंघात तीन मतदानयंत्रे आवश्यक आहेत. एका यंत्रात 16 उमेदवारांची नावे असतात.

15 हून अधिक उमेदवार असलेले मतदारसंघ असे?  कुडची (19), जमखंडी (20), रायचूर (27), हुबळी? धारवाड    सेंट्रल ( 26), बळ्ळारी शहर होळलकेरे (20), शिमोगा (20), चिक्कमंगळूर (18). मूळबागिलू (29) कोलार (21),  के.आर.पूर (21) , ब्याटरायनपूर (19), यशवंतपूर ( 20), हेब्बाळ ( 28),  शांतीनगर (18), चामराजपेठ (21),  चिक्कपेठ (27), जयनगर व बोम्मनहळ्ळी , कृष्णराज (19),  वरूणा (23).

मतदानंतर मतदाराच्या बोटाला लावण्याची शाई म्हैसूरच्या पेंटस् अँड वार्निश कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहे.  कंपनीने 10 मि.मी.च्या 1 लाख, 32 हजार बाटल्या राज्य निवडणूक आयोगाकडे पुरविल्या आहेत. एका बाटलीतील शाई  800  मतदारांच्या बोटाला लावण्यास उपयोगी पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 5 कोटी, 10 लाखांहून अधिक मतदार पात्र आहेत.