बेळगाव : प्रतिनिधी
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील 18 मतदारसंघांतून 49 जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता 203 उमेदवार आहेत. बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीणमधून एकूण 11 जणांनी माघार घेतली तर खानापूरमधून 5 जणांनी माघार घेतली.
बेळगाव दक्षिणमधून 7 जणांनी माघार घेतली असून 13 उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव उत्तरमधून केवळ एकाच उमेदवाराने माघार घेतल्याने 15 जण रिंगणात आहेत. तर बेळगाव ग्रामीणमध्ये तिघांनी माघार घेतली असून 12 उमेदवार रिंगणात आहेत. खानापुरातून 5 जणांनी माघार घेतली असून 13 जण आपले नशीब आजमवणार आहेत. निपाणी व हुक्केरी मतदारसंघातून कोणीही माघार घेतलेली नाही.