Tue, Dec 10, 2019 13:42होमपेज › Belgaon › भरारी पथकाकडून १४ लाख जप्‍त

भरारी पथकाकडून १४ लाख जप्‍त

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 23 2019 1:33AM
बेळगाव  : प्रतिनिधी

पुरावे  नसताना पैशाची वाहतूक करणार्‍या कारवर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून 14 लाख रुपये जप्त केले आहेत, तसेच कारसह चौघांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरा मुनवळी (ता. सौंदत्ती) येथे  ही कारवाई करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून असताना 50 हजार पेक्षा अधिक रक्‍कम घेउन जाण्यास निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. तरीही सोमवारी 14  लाख 16 हजारांची रक्‍कम कारमधुन घेउन जात असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या फ्लाईंग स्क्‍वॉडला मिळाली होती. ही रक्‍कम निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडे  हस्तांतरित केली आहे. 

जप्‍त करण्यात आलेली रक्‍कम कोठून कोठे घेउन जाण्यात येत होती व ही रक्‍कम कोणाची याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी अधिकार्‍यांकडून संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती आचारसंहिता जिल्हा नोडल अधिकारी जगदीश रुगी यांनी दिली.