Mon, Jun 17, 2019 10:36होमपेज › Belgaon › बारावीचा निकाल जाहीर; बेळगाव शेवटून पाचवा

बारावीचा निकाल जाहीर; बेळगाव शेवटून पाचवा

Published On: Apr 15 2019 5:18PM | Last Updated: Apr 15 2019 5:18PM
बंगळूर : प्रतिनिधी

बारावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा सरासरी निकाल 61.16 टक्के लागला आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका सी. शीखा यांनी सोमवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत निकालाविषयी माहिती दिली. बेळगावला 28 वे स्थान मिळाले आहे.

विज्ञान शाखेचा 66.58, वाणिज्य 66.39 आणि कला शाखेचा 50.53 टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेत बंगळुरातील कृती (597), वाणिज्य शाखेत बंगळुरातील वर्षिणी आणि अमृता यांनी संयुक्‍तपणे (595) आणि कला शाखेत बळ्ळारीतील स्वाती एस. (595) हिने प्रथम क्रमांक मिळवला. 

उडपी (92.20 टक्के), मंगळूर (90.91 टक्के) आणि कोडगू (83.31 टक्के) जिल्ह्याने अनुक्रमे क्रमांक मिळवले. तर कारवाने 79.59 टक्क्यांसह चौथे स्थान पटकवले. चिकोडी 60.86 टक्क्यांसह 25व्या आणि बेळगाव 56.18 टक्क्यांसह 28व्या स्थानी आहे.