Mon, Dec 09, 2019 10:58होमपेज › Belgaon › बस उलटून 11 प्रवासी जखमी

बस उलटून 11 प्रवासी जखमी

Published On: Jun 30 2019 1:07AM | Last Updated: Jun 30 2019 12:09AM
हुक्केरी : वार्ताहर

चालकाचे नियंत्रण सुटल्याने  केएसआरटीसीची बस उलटून 11 प्रवासी जखमी झाल्याची घटना हुक्केरीजवळ रक्षी क्रॉस येथे शनिवारी सकाळी  11 वाजता घडली. जखमींपैकी बसवाहक  सुनंदा जायप्पा कंबार, मुक्तुमबी मकानदार, रमिया बटगुर्गी व रुक्मिणी कोकरी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर चालक बसवराज भिमाप्पा कुरी, फातिमा हसनसाब मकानदार, अमुशा मकानदार, मुमताज बटगुर्गी, मासाबी इमामसाब बटगुर्गी, रवींद्र अर्जुन भावी, पूर्णिमा रवींद्र भावी या जखमींवर हुक्केरी येथील सरकारी  दवाखान्यात उपचार करण्यात आले.सर्व जखमी रामदुर्ग, घटप्रभा, गोकाक, नरसापूर, पिरनवाडी व तोरगल येथील आहेत. 

बस रामदुर्गहून कोल्हापूरकडे जात होती.  बसमध्ये 35 प्रवासी होते. बस सकाळी अकराच्या सुमारास हुक्केरीजवळ आली असता रक्षी क्रॉस येथील पेट्रोल पंपासमोर अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून बाजूला गेली. बस उलटल्यानंतर घटनास्थळाकडे नागरिकांनी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तातडीने रूग्णवाहिका आल्यानंतर जखमींना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.  घटनास्थळी हुक्केरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. बी. गुडनट्टी यांनी पाहणी केली.