Sat, Jan 18, 2020 23:18होमपेज › Belgaon › अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

नराधमास १० वर्षांची सक्‍तमजुरी

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 1:31AM
बेळगाव : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. बेळगाव) येथील एका नराधमास दहा वर्षांची सक्‍तमजुरी व 22 हजारांचा दंड ठोठावला. तृतीय जिल्हा सत्र आणि विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश जी. नंजुडय्या यांनी हा आदेश बजावला. ज्योतेश शिवाजी नावी (वय 23, रा. लक्ष्मी गल्‍ली, आंबेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी ः कामानिमित्त निघालेल्या एका तरुणीला संशयित जोतेश नावी याने गाठले आणि तिला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शेलोळी येथे नेले. 

या ठिकाणी त्याने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पुन्हा दुचाकीवरुन या तरुणीला आदमपूरला नेले. त्यानंतर 15 मार्च 2018 रोजी मुंबईला नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केले. त्यानंतर 5 एप्रिल 2018 रोजी तिला मुंबईमध्ये बसमध्ये बसवून बेळगावला पाठवले.

याप्रकरणी नावीच्या विरोधात काकती पोलिस ठाण्यात अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलिस निरिक्षक रमेश गोकाक यांनी केला होता. या प्रकरणाची सुनावणी तृतीय जिल्हा सत्र न्यायाधीश जी. नंजुडय्या यांच्या पुढे झाली होती. यामध्ये मंगळवारी आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. आज या प्रकरणाचा निकाल देताना आरोपीस 10 वर्ष सक्‍त मजुरी आणि 22 हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यामध्ये 25 साक्षीदार आणि मुद्देमाल तपासण्यात आले.