Sat, Jul 11, 2020 13:12होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : जेहुर येथे विजेच्या धक्‍क्याने तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद : जेहुर येथे विजेच्या धक्‍क्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Dec 27 2018 9:14PM | Last Updated: Dec 27 2018 9:14PM

कन्नड : प्रतिनिधी

तालुक्यातील जेहुर येथे विजेच्या धक्‍क्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास शेतातील राहत्या घरी ही घटना घडली. संजय शेषराव पवार (३४) असे मृत तरुणाचे नाव असून तो जेहुर येथील जागरण-गोंधळात मुरळीचे काम करणारा लोक कलावंत होता.

याबाबद अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री संजय पवार आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यानतंर मोबाईल चार्जिगंला लावण्यासाठी घरात असलेल्या बोर्डजवळ गेला. चार्जेर बोर्डच्या पिनमध्ये टाकताच चार्जरचा अचानक स्‍फोट झाला व त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्‍क्यात संजय याचा जागीत मृत्यू झाला. संजय याचा मृत्यू विजेच्या अतिरिक्त दाबाने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच देवगाव रंगारी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. घटनेची अकस्‍मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी कन्‍नड येथील ग्रामीण रुग्‍णालयात पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संतोष पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्‍नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. गावातील हरहुन्‍नरी लोक कलावंताचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. 

विजेचा अतिरिक्‍त दाब कधीच नसतो : उपकार्यकारी अभियंता

झालेली घटना दुर्दैवी असून अतिरिक्त विजेच्या दाब हा कधीच नसतो. तसे असते तर गावातील इतर काही चार्जर व इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू जाळल्या असत्या. साठ रुपयाचे लोकल बनावट चार्जर वापरल्यामुळेच त्या चार्जरचा स्फोट झाला असावा. शेतात राहणा-यांनी तरी किमान चागल्या कंपनीचे जार्जर वापरावे असे आवाहन करत असल्याचे उपकार्यकारी अभियंते विजय दुसाने यांनी सांगितले.