Wed, Jun 19, 2019 09:08होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : शिऊर येथील देवी मंदिरातील मुकुट चोरीला

औरंगाबाद : शिऊर येथील देवी मंदिरातील मुकुट चोरीला

Published On: Oct 11 2018 7:52PM | Last Updated: Oct 11 2018 7:52PMशिऊर : प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे बाजरतळ परिसरातील देवीच्या मंदिरातून मूर्तीवरील मुकुट चोरीला गेला. गुरुवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील मुकुट लंपास केला. या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

बुधवारपासून शारदीय नवरात्रोत्‍सवास प्रारंभ झाला आहे. शिऊर वासीयांनी वर्गणीतून देवीच्या मूर्तीसाठी चांदीचा मुकुट तयार करून घेतला होता. गुरुवारी दुपारी मंदिरातील मूर्तीवर मुकुट नसल्याचे आढळले. याबाबत पोलिस पाटील सुनील देशमुख, गोरख तुप, बंडोपंत लाखेस्‍वामी यांच्यासह गावकर्‍यांनी याबाबत पोलिसांना कळवले. 

पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पाहणी केली. तसेच लवकरात लवकर या चोरीचा छडा लावणार असल्याचे सांगितले.