Thu, Dec 13, 2018 02:09होमपेज › Aurangabad › पोलिसांची झोप उडविणारा चेन स्नॅचर पोलिसच!

पोलिसांची झोप उडविणारा चेन स्नॅचर पोलिसच!

Published On: Oct 12 2018 9:14AM | Last Updated: Oct 12 2018 9:14AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येथील सातारा परिसरात महिनाभरात अनेक महिलांचे मंगळसूत्र हिसकावून पोलिसांची झोप उडविणारा चक्क भारत बटालियनचा (राज्य राखीव पोलिस दल) पोलिस कॉन्स्टेबल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेने योगेश सिंघाटे (वय ३३) नामक पोलिस कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ ते ८ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसीपी नागनाथ कोडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या कारवाईमुळे सातारा परिसरातील (औरंगाबाद) एसआरपीएफ कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने केली आहे.