होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एमआयटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू

औरंगाबाद : 'त्या' विद्यार्थ्याचा अखेर मृत्यू

Published On: Apr 11 2018 12:50PM | Last Updated: Apr 11 2018 12:49PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग कॉलेजच्या सचिन सुरेश वाघ (१९, रा. नवनाथनगर, हर्सूल) या विद्यार्थ्याचा बुधवारी पहाटे ३.१० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिनने कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे तो जखमी झाला होता. दरम्यान, या प्रकरणी प्राचार्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करीत जमावाने सातारा ठाण्यात गर्दी केली, परंतु पोलिसांनी गुन्हा न नोंदविता केवळ तक्रार अर्ज घेऊन जमावाला चौकशीचे आश्‍वासन दिले. 

वाचा : कॉपी करताना पकडल्याने आत्महत्येचा प्रयत्न (Video)

सचिनला कॉपी करताना पकडल्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. परंतु, प्राचार्यांनी त्याला रस्टीकेट करण्याची धमकी दिल्यानंतरच सचिनने हा निर्णय घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी सचिनने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. बुधवारी पहाटे ३.१० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी त्याच्या मित्रांसह नातेवाईकांनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी सातारा ठाण्यात गर्दी केली. 

या प्रकरणी सचिनच्या वडिलांनी प्राचार्यांविरुद्ध तक्रार अर्ज दिला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सचिनला कॉपी करताना पकडल्यामुळेच त्याने हा प्रकार केल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. 

Tags : aurangabad, student suicide, mit student suicide