Sat, Jul 04, 2020 05:13होमपेज › Aurangabad › रेकॉर्ड ब्रेक चटके

रेकॉर्ड ब्रेक चटके

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 12:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वाढते उन्ह शरीराला त्रास देत आहे, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे वाढते दर खिशाला फटका आणि मनाला झटका देऊ लागले आहेत. एप्रिल अखेरीस पेट्रोलच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून औरंगाबादेत दोन दिवसांपासून एक लिटर पेट्रोलसाठी 83.46 रुपये मोजावे लागत आहेत. 

एप्रिल 2014 मध्ये 81 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल-डिझेलचे दर डिसेंबर 2014 पर्यंत 69 रुपयांपर्यंत कमी झाले होते. एप्रिल 2015 मध्ये पेट्रोलचे दर 67 तर डिझेल 57 रुपयांपर्यंत खाली आले. डिसेंबर 2015 पर्यंत त्यात एक ते दीड रुपयांनी घट झाली होती. मार्च 2016 पर्यंत एक लिटर पेट्रोलसाठी 65 रुपये मोजावे लागत होते. इंधनाचे दर कमी झाल्याने अच्छे दिनचा अनुभव सर्वसामान्य नागरिक घेत होते. एप्रिल 2016 नंतर मात्र अच्छे दिनचे घोडे रुसले, एप्रिलमध्ये दोन रुपयांनी वाढ झाली व त्यानंतर सतत वाढ होत डिसेंबर 2016 पर्यंत पेट्रोलचे दर 74.93 तर डिझेलचे दर 63.18 पर्यंत पोहचले होते. डिसेंबर 2016 पासून पेट्रोलच्या दराने सत्तरीत प्रवेश केला. जुलै 2017 पासून 75 रुपये प्रतिलिटर असलेेले पेट्रोलचे दर सतत वाढत गेले आहेत. 8 सप्टेंबर 2017 पासून पेट्रोलच्या दराने 80 चा पल्ला गाठला आहे. महिनाभरानंतर पेट्रोल दीड-दोन रुपयांनी स्वस्त झाले. 16 जानेवारी 2018 ला पुन्हा पेट्रोल 80.08 रुपये प्रतिलिटर झाले अन् तेव्हापासून पेट्रोलच्या दराचा आलेख वाढतच चालला आहे.